पिंपरीत ९२ हजार दुबार मतदार
पुणे, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदारयादीमध्ये ९२ हजार ६६४ दुबार मतदार आढळल्याचे समोर आले आहे.महापालिका निवडणूक विभाग स्थळपाहणी करणार आहे.निवडणूक विभागाने गुरुवारी प्रभागनिहाय प्
PCMC


पुणे, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदारयादीमध्ये ९२ हजार ६६४ दुबार मतदार आढळल्याचे समोर आले आहे.महापालिका निवडणूक विभाग स्थळपाहणी करणार आहे.निवडणूक विभागाने गुरुवारी प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली आहे. शहरातील चार विधानसभा मतदारसंघात १७ लाख १३ हजार ८९१ मतदार आहेत. प्रभाग क्रमांक एक ते ३२ मध्ये ९२ हजार ६६४ दुबार मतदार असल्याचे समाेर आले आहे.दुबार मतदारांची महापालिकेच्या निवडणूक विभागामार्फत प्रत्यक्ष स्थळपाहणी केली जाणार आहे. दुबार मतदारांकडून काेणत्या प्रभागात मतदान करणार याबाबतचा अर्ज भरून घेतला जाणार आहे. त्यानंतर अंतिम मतदारयादीत अशा मतदारांच्या नावापुढे दाेन ‘स्टार’ दिले जाणार आहेत, अशी माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande