
पुणे, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)। सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयात कंत्राटी कचरा वेचक कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. यात सुरक्षित कामकाज आणि संवादकौशल्य वाढविण्याच्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पुणे नॉलेज क्लस्टर आणि पुणे महापालिका यांच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेत कचरा वेचकांच्या भूमिकेची ओळख, कचरा वर्गीकरणाचे महत्त्व, विविध प्रकारच्या कचऱ्याची हाताळणी, सुरक्षितता उपाय आणि कार्यक्षमतेत वाढ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.रंगकोडेड डस्टबिन प्रणाली, स्वच्छता पद्धती आणि सुरक्षा साहित्याचा योग्य वापर यावरही भर देण्यात आला. यानंतर ‘नागरिकांशी संवाद’ या विषयावर प्रत्यक्ष भूमिका सादरीकरणाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. नागरिकांना कचरा वर्गीकरणाविषयी माहिती देताना कोणत्या पद्धती प्रभावी ठरतात, प्लास्टिक कचऱ्याची माहिती, स्वच्छताविषयक जनजागृती आणि निरोगी सवयींबाबत मार्गदर्शन अशा विषयांचा समावेश होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु