
पुणे, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।
पुणे ग्रॅंड चॅलेंज दूर सायकलिंग स्पर्धा २०२६ दरम्यान स्पर्धकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्गावरील डांबरीकरणाचे काम सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ तसेच शासनाच्या गृह विभागाच्या 19 मे 1990 च्या अधिसूचनेनुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान दररोज सकाळी 8 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत संबंधित मार्गांवरील सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गांनी वाहतूक वळविण्याचा आदेश जारी केला आहे.
पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे - मोरगाव ते मुर्टी रोड काम सुरू असताना वाहतूक मोरगाव – लोणीपाटी – लोणी भापकर – पेशवे वस्ती (कोऱ्हाळे बु) – करंजेपूल – सोमेश्वरनगर अशी जाईल. मुर्ती ते चौधरवाडी फाटा रोडचे काम सुरू असताना वाहतूक मुर्ती – वाकी – करंजे – सोमेश्वरनगर अशी जाईल. तर चौधरवाडी फाटा ते निरा रोड काम सुरू असताना वाहतूक चौधरवाडी फाटा – करंजे – सोमेश्वर अशी जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु