
छत्रपती संभाजीनगर, 21 नोव्हेंबर (हिं.स.) दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थाना नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था व त्यांच्याकडे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 च्या कलम 49-53 नुसार वैद्य नोंदणी प्रमाणपत्र नाहीत. अशा नागरी समाज संघटना/संस्थांनी 17 ऑक्टोबर 2025 रोजीच्या शासन निर्णयातील नमुद प्रस्ताव जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्या कार्यालयात दि. 27 नोव्हेंबर 2025 रोजी किंवा त्यापुर्वी समक्ष उपस्थित राहून सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नु पी. एम. यांनी केले आहे.
दिव्यांग कल्याण विभागाच्या 17 ऑक्टोबर 2025 च्या शासन निर्णयानुसार दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या नोंदणी देखरेख आणि नूतनीकरणासाठी मानक कार्यप्रणाली विहित करण्याबाबत मार्गदर्शक सुचना निर्गमित करुन महाराष्ट्र शासन दिव्यांग व्यक्तीची प्रतिष्ठा, हक्क आणि सुरक्षा यांच संरक्षण करण्यास कटिबध्द आहे. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणात नागरिक, नागरी समाज संघटना/संस्था महत्वपुर्ण भूमिका बजावतात. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 च्या कलम 49-53 पुनर्वसन आणि सक्षमीकरण क्षेत्रात काम करणाऱ्या नागरी समाज संघटनांची/संस्थांची नोंदणी अनिवार्य आहे. तथापी दिव्यांग क्षेत्रात अनेक नागरी समाज संघटना/संख्या अद्याप वैद्य नोंदणीशिवाय दिव्यांग क्षेत्रात कार्यरत आहेत, असे निदर्शनास आले आहे. ही बाब दिव्यांग हक्क अधिनियम, 2016 च्या कलम 50 चे उल्लघंन करणारी आहे. कोणतीही व्यक्ती अथवा नागरी समाज संघटना/संस्था दिव्यांग क्षेत्रात वैद्य नोंदणीशिवाय कार्य करु शकत नाही, असे स्पष्ट नमूद आहे. यासंदर्भात दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालयाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 7 बैठक घेऊन यासंदर्भात निर्देश दिले आहेत. ज्या संस्थां दिव्यांग क्षेत्रात काम कीरीत आहेत व त्यांच्याकडे दिव्यंग क्षेत्रात कार्य कण्याकरीता वैद्य नोंदणी प्रमाणपत्र नाही अशा संस्थांनी वैद्य नोंदणी प्रमाणपत्र मिळण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा वैद्य नोंदणी प्रमाणपत्राशिवाय दिव्यांग क्षेत्रात काम करीत असल्यास दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 च्या कलम 91 अन्वये दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थावर कारवाई करण्यात येईल. असे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी जि.प. जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis