
सोलापूर, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)। फार्मर आयडी असेल तरच शेतकऱ्यांना अतिवृष्टी वा महापुराची भरपाई देण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. त्यामुळे मदत मंजूर झाली असूनही फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांचे आयडी काढण्यासाठी बाधित शेतकरी आणि स्थानिक महसूल प्रशासनाने कमालीची घाई करत आहेत.
जिल्ह्यातील जवळपास ७८ हजारांहून अधिक फार्मर आयडी सध्या प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे.नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये तहसीलदारांसह तालुका तसेच गाव पातळीवरील महसूल यंत्रणा कामाला लागली आहे. तहसीलदारांसह महसूलची यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने नव्याने काढण्यात येणाऱ्या फार्मर आयडीकडे दुर्लक्ष होत आहे. फार्मर आयडी काढण्यासाठी त्या-त्या तहसीलदारांचेच फेस रेकिग्नेशन आवश्यक आहे. एका आय डीसाठी तहसीलदारांना किमान दोन ते तीन मिनिटांचा वेळ द्यावा लागत आहे. निवडणुकीच्या धामधुमीत फार्मर आय डीच्या कामासाठी तहसीलदारांची सुटका होताना दिसत नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड