
सोलापूर, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व सहकारी साखर कारखानदारीचे हिरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सहकारी साखर कारखान्यांची गुणवत्ता वाढविणे आणि कारखान्यामध्ये आर्थिक सक्षमता निर्माण करण्याची गरज लक्षात घेता शासनाद्वारे स्पर्धात्मक गुणवत्ता असणाऱ्या कारखान्यांची निवड करून त्यांना सन्मानित करणे व प्रोत्साहित करण्यासाठी राज्य शासनाने प्रोत्साहन योजना घोषित केला आहे. वेळेवर कर्ज फेडण्यास शेतकऱ्यांना चांगले दर देणाऱ्या साखर कारखान्यांना बक्षिस दिले जाणार आहे.सहकारामुळे शेतकऱ्यांच्या विकासाला आर्थिक बळ मिळाले आहेत. यात सहकारी तत्वावर साखर कारखान्यांचा मोलाचा वाटा आहे. मागील दशकात सहकारी कारखाने अडचणीत येत असतानाच खासगी तत्वावरील साखर कारखाने उभी राहिली आहेत. त्यामुळे साखर कारखानदारांत स्पर्धात्मक गुणवत्ता येण्यासाठी उत्तम कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना बक्षिसे देण्याचा निर्णय राज्य शासनाने दिला असून, सन 2025-26 या गळीत हंगामपासून कारखान्यासाठी ही योजना लागू राहणार आहे.प्रोत्साहन योजनेसाठी राज्य शासनाने 9 निकष ठरविले आहेत. या निकषासाठी गुण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सहकारमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील समिती बक्षिसासाठी साखर कारखान्यांची निवड करणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड