परभणी जि.प.पं.स निवडणुका ठाकरे गट पूर्ण ताकतीने लढवणार - संजय जाधव
परभणी, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। आगामी येणाऱ्या जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुका पुर्ण ताकदीने लढण्याचा निर्धार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते परभणीचे खा. संजय उर्फ बंडू जाधव यांनी पाथरी येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलतांना व्यक्त केला.
खा. संजय जाधव यांची माहिती


परभणी, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। आगामी येणाऱ्या जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुका पुर्ण ताकदीने लढण्याचा निर्धार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते परभणीचे खा. संजय उर्फ बंडू जाधव यांनी पाथरी येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलतांना व्यक्त केला.

जि. प. पं. स. निवडणुकीत संदर्भात शिवसेना पदाधिकारी यांची बैठक पाथरीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना उपनेते खासदार जाधव जिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे माजी जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, तालुकाप्रमुख मुंजाभाऊ कोल्हे उपस्थित होते.

यावेळी येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेण्यात आल्या. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक सर्व ताकदी निशी लढवणार असल्याचे यावेळी खासदार जाधव यांनी व्यक्त केले. येणाऱ्या काळात सर्व कार्यकर्त्यांनी महायुती सरकारचा भ्रष्टाचार जनते समोर घेऊन जात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या कामाच्या जोरावर आपण निवडणुकीला सामोरे जाऊ व या महायुती सरकारला धडा शिकवू असे ते या वेळी म्हणाले.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवू तसेच पाथरी पंचायत समितीवर शिवसेनेचे वर्चस्व कसे राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन खासदार जाधव यांनी व्यक्त केले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत कार्यकर्त्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या. या कार्यक्रमाचे आभार तालुका प्रमुख मुंजाभाऊ कोल्हे यांनी मानले. या बैठकी साठी माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पं स सदस्य आणि तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande