
नांदेड, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।
भगवान श्री सत्य साईबाबा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने पुट्टपार्थी, आंध्र प्रदेश येथे आयोजित ११व्या श्री सत्य साई जागतिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह नांदेडचे भारतीय जनता पक्षाचे खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.
भगवान श्री सत्यसाईबाबा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन पुट्टपार्थी येथे करण्यात आले.
याप्रसंगी ओडिशाचे राज्यपाल डॉ. हरी बाबू, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्री सत्यसाई सेवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष निमिष पंड्या, व्यवस्थापकीय संचालक आर. जे. रत्नाकर, माजी केंद्रीय मंत्री खा.डॉ. भागवत कराड यांच्यासह अनेक मान्यवर आणि जगभरातून आलेले भाविक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis