साेलापुरात बाईक रॅली काढल्यास होणार गुन्हा दाखल - पोलिस आयुक्त
सोलापूर, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)। शहरातील रस्ते अरुंद असून पार्किंगअभावी बहुतेक रस्त्यांलगत वाहने उभी असतात. अशा स्थितीत बाईक रॅली काढल्यास पूर्ण रस्ता जाम होतो. त्यामुळे सर्वसामान्यांना ये-जा करता येत नाही. रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवेतील वाहने जाऊ
Cp


सोलापूर, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)। शहरातील रस्ते अरुंद असून पार्किंगअभावी बहुतेक रस्त्यांलगत वाहने उभी असतात. अशा स्थितीत बाईक रॅली काढल्यास पूर्ण रस्ता जाम होतो. त्यामुळे सर्वसामान्यांना ये-जा करता येत नाही. रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवेतील वाहने जाऊ शकत नाहीत. त्यामुळे शहर पोलिसांनी बाईक रॅलीला परवानगी देणे बंद केले आहे.

शहरात सध्या महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम ३७(३) लागू असून, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार आहेत.एका नेत्याने किंवा राजकीय पक्षाने बाईक रॅली काढल्यानंतर पुन्हा तशी प्रथा पडते. त्यामुळे शहरातील सामान्य नागरिकांना त्रास सोसावा लागतो. त्यावर शहर पोलिसांनी परवानगी देणेच बंद केले आहे. आमदारांचे विशेषत: सत्ताधारी आमदारांचे उत्साही कार्यकर्ते पोलिसांची परवानगी न घेताच रॅली काढतात; पण त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होतो, त्याचा आपल्याच मतदानावर परिणाम होईल, याचा विसर पडलेला असतो. आता नक्की लोकप्रतिनिधी याचाही विचार करतील, असा विश्वास पोलिसांना आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande