सोलापुरात आयकर विभागाकडून दुसऱ्या दिवशीही कसून तपासणी
सोलापूर, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)।शहरातील दोन बडे सराफ व्यापारी, एक वकील तसेच बांधकाम व्यावसायिकावर केंद्रीय आयकर विभागाच्या पथकाने छापा टाकला. सलग दुसऱ्या दिवशीही संबंधितांच्या दुकाने, कार्यालयांमध्ये तपासणी सुरू होती. तब्बल 36 तासांहून अधिक काळ कस
सोलापुरात आयकर विभागाकडून दुसऱ्या दिवशीही कसून तपासणी


सोलापूर, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)।शहरातील दोन बडे सराफ व्यापारी, एक वकील तसेच बांधकाम व्यावसायिकावर केंद्रीय आयकर विभागाच्या पथकाने छापा टाकला. सलग दुसऱ्या दिवशीही संबंधितांच्या दुकाने, कार्यालयांमध्ये तपासणी सुरू होती. तब्बल 36 तासांहून अधिक काळ कसून चौकशी होत असल्याचे गुरुवारी दिवसभर दिसून आले. हा छापा नेमका कशासाठी पडला, संबंधित फर्मच्या आर्थिक व्यवहारात काही अनियमितता आढळली का, याविषयी मात्र रात्री उशिरापर्यंत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.सराफ बाजारातील दोन्ही सराफांच्या दुकानात काही आयकर अधिकारी आणि कर्मचारी जुन्या फायली, कागदपत्रे तपासण्याचे काम करीत होते. जुने विठ्ठल मंदिर परिसरातील दुकानात आणि घरात देखील आयकर अधिकारी ठिय्या मांडून होते. तेथे बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात होता. त्यांच्याच नवी पेठेतील घरी आयकर कर्मचारी तैनात होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande