म्हसळ्यात स्मार्ट मीटरच्या विरोधात आंदोलनाचा बिगुल
रायगड, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। तालुक्यात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामाविरोधात नागरिकांच्या वाढत्या नाराजीला जोर मिळत असून, म्हसळा संघर्ष समितीने महावितरणाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. दि. २१ नोव्हेंबर रोजी समितीने महावितरण कार्या
तालुक्यात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामाविरोधात नागरिकांच्या वाढत्या नाराजीला जोर मिळत असून, म्हसळा संघर्ष समितीने महावितरणाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. दि. २१ नोव्हेंबर रोजी समितीने महावितरण कार्यालयात जाऊन स्मार्ट मीटर बसविणे तात्काळ बंद करण्याबाबत निवेदन सादर केले.  यापूर्वीही समितीतर्फे महावितरणाला निवेदन देऊन ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसविणे थांबवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, महावितरणाने त्याकडे दुर्लक्ष करून मनमानी पद्धतीने काम सुरू ठेवल्याचा थेट आरोप समितीने केला आहे. ग्राहकांना प्रचंड वीजबिलांचा सामना करावा लागत असून, आर्थिक भार वाढत चालल्याचे समितीचे सल्लागार संतोष पाटील यांनी सांगितले. “जर १५ दिवसांत स्मार्ट मीटर बसविण्याचे काम थांबवले नाही, तर आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.  निवेदन देताना समिती अध्यक्ष समीर काळोखे, सल्लागार संतोष पाटील, नगरसेवक सुनिल शेडगे, प्रकाश घाणेकर, सुमित सावंत, सुरेश कुडेकर, नईम दळवी, अशोक पाटील यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. जुन्या मीटरांची स्थिती उत्तम असतानाही ग्राहकांना न विचारता स्मार्ट मीटर बसविले जात असल्याची तक्रारही समितीकडून करण्यात आली आहे.  दरम्यान, या आरोपांवर महावितरणचे अभियंता पालशेकर यांनी प्रतिक्रिया देताना, “आम्ही केंद्र शासनाच्या परिपत्रकानुसारच काम करीत आहोत. फक्त बंदावस्थेतील मीटर किंवा ज्यांना एव्हरेज बिल येते अशाच मीटरची अदलाबदल केली जाते. सुस्थितीत असलेले मीटर आम्ही काढत नाही,” असे स्पष्टीकरण दिले.  स्मार्ट मीटरविरोधातील आंदोलनाची चेतावणी दिल्याने म्हणसळा तालुक्यातील वीज प्रशासन आणि नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


रायगड, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। तालुक्यात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामाविरोधात नागरिकांच्या वाढत्या नाराजीला जोर मिळत असून, म्हसळा संघर्ष समितीने महावितरणाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. दि. २१ नोव्हेंबर रोजी समितीने महावितरण कार्यालयात जाऊन स्मार्ट मीटर बसविणे तात्काळ बंद करण्याबाबत निवेदन सादर केले.

यापूर्वीही समितीतर्फे महावितरणाला निवेदन देऊन ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसविणे थांबवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, महावितरणाने त्याकडे दुर्लक्ष करून मनमानी पद्धतीने काम सुरू ठेवल्याचा थेट आरोप समितीने केला आहे. ग्राहकांना प्रचंड वीजबिलांचा सामना करावा लागत असून, आर्थिक भार वाढत चालल्याचे समितीचे सल्लागार संतोष पाटील यांनी सांगितले. “जर १५ दिवसांत स्मार्ट मीटर बसविण्याचे काम थांबवले नाही, तर आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.निवेदन देताना समिती अध्यक्ष समीर काळोखे, सल्लागार संतोष पाटील, नगरसेवक सुनिल शेडगे, प्रकाश घाणेकर, सुमित सावंत, सुरेश कुडेकर, नईम दळवी, अशोक पाटील यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. जुन्या मीटरांची स्थिती उत्तम असतानाही ग्राहकांना न विचारता स्मार्ट मीटर बसविले जात असल्याची तक्रारही समितीकडून करण्यात आली आहे.दरम्यान, या आरोपांवर महावितरणचे अभियंता पालशेकर यांनी प्रतिक्रिया देताना, “आम्ही केंद्र शासनाच्या परिपत्रकानुसारच काम करीत आहोत. फक्त बंदावस्थेतील मीटर किंवा ज्यांना एव्हरेज बिल येते अशाच मीटरची अदलाबदल केली जाते. सुस्थितीत असलेले मीटर आम्ही काढत नाही,” असे स्पष्टीकरण दिले.स्मार्ट मीटरविरोधातील आंदोलनाची चेतावणी दिल्याने म्हणसळा तालुक्यातील वीज प्रशासन आणि नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande