
यावली शहीद ग्रामपंचायतचा अभिनव उपक्रम
अमरावती, 21 नोव्हेंबर (हिं.स.)
येथून जवळच असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव ग्राम यावली शहीद येथील ग्रामपंचायतच्या वतीने राज्यातील पहिले अभिनव आंदोलन घरकर भरण्यासाठी आयोजित करण्यात आले होते.या आंदोलनामध्ये सरपंच शिल्पा खवले उपसरपंच नितीन पाचघरे ग्राम अधिकारी बैलमारे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य गावकरी सहभागी झाले होते. अनेक दिवसांपासून थकीत असलेले कर गावकऱ्यांनी सवलतीच्या दरात भरून शासनाच्या सवलती योजनेचा फायदा घ्यावा तसेच आपला घरकुल नियमित भरावा याकरता यावली शहीद ग्रामपंचायत अंतर्गत जनजागृती आंदोलन करण्यात आले होते हे राज्यातील पहिले जनजागृती आंदोलन असल्याचे बोलल्या जात आहे यावली शहीद गावातील प्रमुख मार्गाने विविध घोषणा देत ही आंदोलक मंडळी मार्गक्रमण करत होती यावेळी या रॅलीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे वेशभुषाधारण केलेले व्यक्तिमत्व सहभागी झाले होते तर दिव्यांग बांधव सुद्धा या जनजागृती रॅलीमध्ये सहभागी झाले होते ग्रामपंचायतची आर्थिक परिस्थिती सुधारली तरच जोमानं काम करता येते. खरं तर हे सारं गावच्या हितासाठी आहे. गावात सर्व सुविधा हव्यात मग ग्रामस्थांनी घरपट्टी भरणं महत्वाचं आहे. सर्वात आधी गावातील महिलांची बैठक घेतली. गावाच्या विकासासाठी घरपट्टी भरणं किती महत्वाचं, याबाबत त्यांना समजावून सांगितलं. सरपंच आणि उपसरपंच यांनी देखील या कार्यात उत्साह दाखवला. गावातील अनेकांनी घरपट्टी भरण्यासाठी पुढाकार घेतला. प्रत्येक घरांचा कर वसूल व्हायला हवा, यासाठी गुरुवारी गावातून ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, शाळेचे विद्यार्थी यांच्यासह गावभर मोर्चा काढला आणि घरपट्टी भरणं किती महत्वाचं आहे, याबाबत ग्रामस्थांना जागृत करण्याचा प्रयत्न केला, असं देखील ललित बैलमारे यांनी सांगितलं.यावेळी सरपंच सौ शिल्पा खवले उपसरपंच नितीन पाचघरे ग्राम अधिकारी ललित बैलमारे ग्रामपंचायत सदस्य योगेश निंभोरकर, ग्रामपंचायत सदस्या निरंजना मेश्राम, माजी सरपंचा अलका दामले ,सामाजिक कर्यकर्ते तुषार खवले, गंगाधर श्रीखंडे,निलेशा कांडेलकर, सुलभा कांडलकर, सोनाली नागोने, प्रेमाली यावलेसह सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामवासी सहभागी झाले होते.
गावकऱ्यांनी आपल्याकडे असलेल्या थकीत कराची भरणा नियमित केली पाहिजे त्या रकमेतून गावाच्या सर्वांगीण विकासाकरीता उपाययोजना करता येईल शिवाय वसुली करावर आधारित ग्राम विकासाचे कार्य असून जास्तीत जास्त गावकऱ्यांनी तात्काळ कराची भरणा करावी.
शिल्पा तुषार खवले सरपंच - ग्रामपंचायत यावली शहीद
गावाचा विकास हे राष्ट्रसंतांचं स्वप्न :
भारतातले 7 लाख गावं विकसित झाली तर देशाचा विकास होईल, असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे. आज राष्ट्रसंतांच्या जन्मभूमी असणाऱ्या आमच्या यावली शहीद गावातल्या लोकांची गावाच्या विकासासाठीची जबाबदारी ही इतर गावांपेक्षा अधिक आहे, असं गावातील ज्येष्ठ व्यक्ती गंगाधर श्रीखंडे म्हणाले. आजवर गावच्या विकासासाठी ग्रामस्थ अनेकदा एकत्र आलेत. घरपट्टी भरून ग्रामपंचायतला देखील सर्व सहकार्य करतील, असा विश्वास देखील गंगाधर श्रीखंडे यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी