रत्नागिरी : ‘आध्यात्मिक आरोग्य’ या विषयावर शनिवारी व्याख्यान
रत्नागिरी, 21 नोव्हेंबर, (हिं. स.) : आयुर्वेदाचार्य सुविनय दामले यांचे ‘आध्यात्मिक आरोग्य’ या विषयावरील व्याख्यान शनिवारी आयोजित करण्यात आले आहे. रत्नागिरी शहरातील खालची आळी येथील मारुती कॉमन क्लब (माघी गणेशोत्सव मंडळ) सुवर्ण महोत्सवानिमित्त प्रत्
रत्नागिरी : ‘आध्यात्मिक आरोग्य’ या विषयावर शनिवारी व्याख्यान


रत्नागिरी, 21 नोव्हेंबर, (हिं. स.) : आयुर्वेदाचार्य सुविनय दामले यांचे ‘आध्यात्मिक आरोग्य’ या विषयावरील व्याख्यान शनिवारी आयोजित करण्यात आले आहे.

रत्नागिरी शहरातील खालची आळी येथील मारुती कॉमन क्लब (माघी गणेशोत्सव मंडळ) सुवर्ण महोत्सवानिमित्त प्रत्येक महिन्याच्या शनिवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचेच औचित्य साधून 22 नोव्हेंबर रोजी आध्यात्मिक आरोग्य (प. पू. गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनात दडलेले आरोग्य) या विषयावर आयुर्वेदाचार्य सुविनय दामले यांचे व्याख्यान श्री मुरलीधर मंदिर, खालची आळी येथे सायं. 7 वाजता आयोजित करण्यात आले आहे.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आयुर्वेदातील उत्कृष्ट वक्ता म्हणून पारितोषिक प्राप्त Delivered International TED talk on Barter System, Recognition by Limca Book Record for using Barter System (वस्तुविनिमय प्रणाली) अशी श्री. दामले यांची ख्याती आहे.सुवर्ण महोत्सवी वर्षात आजपर्यंत सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या लोगोचे अनावरण, मंडळाचे भजन, सुप्रसिद्ध कीर्तनकार कैलास खरे, मुंबईतील सुप्रसिद्ध गायक मनोज देसाई यांचा ‘रंग सुरांचे’, सायबरतज्ज्ञ डॉ. अक्षय फाटक यांचा ‘सायबर संस्कार’, मारुती कॉमन क्लबचा ‘भजन संध्या’, राधेय पंडित यांचा ‘गप्पा ऐतिहासिक रत्नागिरीच्या’, सुप्रसिद्ध गायक राजाभाऊ शेंबेकर यांची अभंग-नाट्यसंगीतांची मैफिल असे विविधरंगी कार्यक्रम पार पडले आहेत.आयुर्वेदाचार्य सुविनय दामले यांच्या ’आध्यात्मिक आरोग्य’ या आगळ्यावेगळ्या विषयावरील व्याख्यानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मारुती कॉमन क्लबतर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande