पनवेल : प्रभाग १३ मधून विद्या तामखेडेंची उमेदवारी
रायगड, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। पनवेल महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांची तयारी सुरू झाली असून राजकीय वातावरणाला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर कामोठे प्रभाग क्र. १३ मधील महिला राखीव जागेसाठी विद्या तामखेडे यांची उमेदवारी गंभीरपणे चर्चेत आहे. मागील न
प्रभाग १३ मधून विद्या तामखेडेंची उमेदवारी; समाजकारणातून राजकारणात दमदार प्रवेश


रायगड, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। पनवेल महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांची तयारी सुरू झाली असून राजकीय वातावरणाला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर कामोठे प्रभाग क्र. १३ मधील महिला राखीव जागेसाठी विद्या तामखेडे यांची उमेदवारी गंभीरपणे चर्चेत आहे. मागील निवडणुकीत या प्रभागात शेकाप आणि भाजपामध्ये चार जागांसाठी थेट सामना झाला होता. त्यावेळी दोन्ही पक्षांना प्रत्येकी दोन जागा मिळाल्या होत्या. यंदा महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळाल्याने या प्रभागात महिलांच्या नेतृत्वाला प्राधान्य मिळणार असून विद्या तामखेडे भाजपाकडून मजबूत दावेदार म्हणून पुढे येत आहेत.

समाजकारण आणि राजकारण यांचा योग्य संगम साधत सातत्याने महिलांसाठी कार्य करणारी निर्भीड कार्यकर्ती म्हणून विद्या तामखेडे यांची ओळख आहे. धनगर समाजासह सर्व समाजघटकांसाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. रुग्णालयातील निराधार महिलांना मदत करणे, स्वावलंबनासाठी शिबिरे घेणे, महिलांच्या मूलभूत सुविधांसाठी प्रयत्न करणे, गरजू कुटुंबांना शासन योजनांची उपलब्धता करून देणे अशा अनेक सामाजिक कृतींत त्यांनी आघाडी घेतली आहे. महिला आघाडीच्या माध्यमातून पक्षाच्या मोर्चे, सभांमध्ये नेतृत्वाची जबाबदारी त्यांनी प्रभावीपणे सांभाळली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande