
मुंबई, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)। आटपाडी तालुक्यातील (जि. सांगली) विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शुक्रवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. रमेश उर्फ बंडू शेठ कातुरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती तानाजी यमगर, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद राजमाने आदी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आ. गोपीचंद पडळकर, प्रदेश मध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी यावेळी उपस्थित होते. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्वागत केले. आ. गोपीचंद पडळकर यांच्या पुढाकाराने हे प्रवेश झाले.
भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्यांमध्ये विक्रम माने, वैभव भानुसे, गणेश कातुरे, हिराप्पा यमगर, अविराज यादव, कैलास शेंडगे, वैभव खांडेकर आदींचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर