लोणावळ्यात शरद पवारांच्या पक्षाचा अजित पवारांच्या गटाला बिनशर्त पाठिंबा
पुणे, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत एक मोठी आणि निर्णायक राजकीय घडामोड समोर आली आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून लोणावळ्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने बिनश
लोणावळ्यात शरद पवारांच्या पक्षाचा अजित पवारांच्या गटाला बिनशर्त पाठिंबा


पुणे, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।

लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत एक मोठी आणि निर्णायक राजकीय घडामोड समोर आली आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून लोणावळ्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लोणावळ्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक १३ मध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलं आहे.

यामुळे लोणावळ्यात राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही गटांनी एकत्र येत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. लोणावळ्यात मागील काही दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात संघर्ष दिसून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्रितपणे भाजपविरोधात रणनीती आखत असून शरद पवार गटाने दिलेला बिनशर्त पाठिंबा हा केवळ एक राजकीय निर्णय नसून लोणावळ्यात राष्ट्रवादीच्या पायाभरणीचा मोठा आधार ठरू शकतो. आमदार सुनील शेळके हे लोणावळ्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी प्रमुख रणनीतिकार म्हणून पुढे आले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आली आहे. या एकत्रित येण्याचा सरळ फायदा लोणावळ्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांना होणार असून यामुळे नगरपरिषद निवडणूक भाजप विरुद्ध संयुक्त राष्ट्रवादी अशी होणार आहे. लोणावळ्यातील ही नव्याने उभी झालेली राजकीय मैत्री ही निवडणुकीसाठी ‘गेंम-चेंजर’ ठरू शकते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande