
पुणे, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। महापालिका प्रशासनाने प्रारूप मतदार यादी केल्यानंतर आता त्यातील मतदारांची पळवापळवी समोर येण्यास सुरुवात झाल्याने इच्छुक उमेदवारांची झोप उडाली आहे. एका प्रभागातील शेकडोंच्या संख्येने मतदार अन्य प्रभागात टाकण्यात आले आहेत. यामध्ये भौगोलिक हद्दीचे पालन झाले नाही. इच्छुकांनी अनेक गंभीर त्रुटी समोर आणल्या असून, प्रशासनाच्या कामावर आक्षेप घेतले जात आहेत.पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे.
महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रभागनिहाय याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच मतदार यादीची प्रत मिळावी यासाठी निवडणूक शाखेकडे पैसे भरण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार मतदान केंद्रनिहाय मतदारांची नावे तपासण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये अनेक गडबडी केल्याचे समोर येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु