
सोलापूर, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।मोहोळ नगरपरिषद व अनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आदर्श आचार संहितेचे पालन करणे सर्वांना बंधनकारक असून, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टकर्ते यांच्यावर भारतीय नागरिक सुरक्षा संहिते प्रमाणे कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.मोहोळ नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार प्रक्रीये दरम्यान आचार संहितेचा भंग होईल, अथवा दोन गटात वाद निर्माण होतील, अशा पोस्ट टाकणारा व त्यावरील ग्रुप ॲडमिनलाही दोषी ठरवण्यात येईल. त्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुपवरील सेटिंग बदलून ओनली फॉर ग्रुप ॲडमिन करून घेण्यात यावी. सोशल मीडिया कर्त्यानी कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट टाकणे, त्या पोस्टला लाईक करणे,त्या पुढे फॉरवर्ड करणे व प्रतिसाद देणे हा कायद्याने गुन्हा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड