पुणे - म्हाडाच्या ४,१८६ घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ
पुणे, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। पुण्यात घर घेणाचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडा ने पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ४,१८६ सदनिकांच्या विक्रीकरिता आयोजित संगणकीय लॉटरी
पुणे - म्हाडाच्या ४,१८६ घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ


पुणे, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। पुण्यात घर घेणाचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडा ने पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ४,१८६ सदनिकांच्या विक्रीकरिता आयोजित संगणकीय लॉटरीसाठी अर्ज सादर करण्यासाठी मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. आता ३० नोव्हेंबर, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.

पुण्यात म्हाडाच्या ४१८६ सदनिकांसाठी २० नोव्हेंबर ही अंतिम मुदत होती. या सदनिकांसाठी आतापर्यंत १,८२,७८१ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत त्यातील १,३३,८८५ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. मात्र आता पुणेकरांना स्वप्नातील घर घेण्याची आणखी संधी मिळाली असून लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्जदार ३० नोव्हेंबर, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदार ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा करू शकणार आहेत. दिनांक ०१ डिसेंबर, २०२५ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल.सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन संगणकीय लॉटरी ११ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता काढण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande