मंत्री झिरवाळ व मनोज जरांगे पाटील यांनी केले पीडित बालिकेच्या कुटुंबाचे सांत्वन
मालेगाव, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचार व हत्येच्या भीषण प्रकारानंतर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज घटनास्थळी भेट देत पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. या अमानु
मंत्री झिरवाळ व मनोज जरांगे पाटील यांची डोंगराळे येथे भेट; पीडित बालिकेच्या कुटुंबाचे केले सांत्वन


मालेगाव, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचार व हत्येच्या भीषण प्रकारानंतर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज घटनास्थळी भेट देत पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. या अमानुष घटनेची तेवढीच तीव्र निंदा करत त्यांनी आरोपीला कठोर फाशीपर्यंतची शिक्षा देण्याची मागणी केली.

मंत्री झिरवाळ म्हणाले की, संपूर्ण मंत्रिमंडळासमोर हा मुद्दा मांडून हा खटला फास्ट ट्रॅकवर नेऊन आरोपीला फाशीची शिक्षा दोन महिन्यांच्या आत देत न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू.सरकारी वकील उज्वल निकम यांची या केस साठी नियुक्ती करण्याची मागणी ही करण्यात येईल असे झिरवाळ यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande