
210 उमेदवारांची माघार, नगराध्यक्ष 77, सदस्यासाठी 1329 मैदानात
अमरावती, 22 नोव्हेंबर (हिं.स.)।
जिल्ह्यातील अचलपूर, अंजनगाव सुर्जी वरुड दर्यापूर, चांदूरबाजार, चिखलदरा, धामणगाव रेल्वे, मोर्शी, चांदूर रेल्वे आणिशेंदूरजनाघाटया दहा नगर परिषद आणि धारणी आणि नांदगाव खंडेश्वर या दोन नगर पंचायतीमध्ये आता खऱ्या अर्थाने निवडणूक रणधुमाळी सुरु झाली आहे. नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अध्यक्षपदाच्या ३० तर सदस्यपदाच्या १८० अशा २१० उमेदवारांनी निवडणुकीचे मैदान सोडले. त्यामुळे आता १२ अध्यक्षपदासाठी ७७तर २५८ सदस्यपदाकरिता १३२९ उमेदवार निवडणूक मैदानात लढण्यासाठी कायम आहेत. विशेष म्हणजे शुक्रवारी नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वाधिक १६९ उमेदवारांनी माघार घेतली आहे.नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता १० ते १७ नोव्हेंबर दरम्यान उमेदवारांचे नामांकन अर्ज स्वीकारण्यात आले. या अर्जाची १८ नोव्हेंबर रोजी छाननी प्रक्रिया पार पडली. तर १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान उमेदवारांना नामांकन अर्ज मागे घेण्याची संधी देण्यात आली होती. या दरम्यान निवडणुकविभागाकडे सदस्य पदाकरिता १०८ तर सदस्यांकरिता १५१६ नामांकन प्राप्त झाले होते. या तीन दिवसांत अध्यक्ष पदाच्या ३० तर सदस्य पदाच्या १८० उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतले आहे. शुक्रवारीशेवटच्या दिवशी अध्यक्ष पदाकरिता २२ तर सदस्यांकरिता १४७ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे सद्या अध्यक्षपदाकरिता ७७ व सदस्यांकरिता १३२९ नामांकन शिल्लक आहेत.
अवैध नामांकन उमेदवाराला २५ पर्यंत अपीलाची संधी
दरम्यान ज्या उमेदवारांचे नामांकन अवैध ठरविण्यात आले होते. त्यांना अपीलाची संधी देण्यात आली आहे. ही प्रक्रिया २५ नोव्हेंबरपर्यंत चालणार असून त्यानंतर २६ नोव्हेंबरला निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून त्यांना त्याच दिवशी चिन्हांचे वाटप होणार आहे. त्यानंतर प्रचारा सुरूवात होईल. त्यामुळे प्रचाराच्या चार ते पाच दिवसांत उमेदवरांची खरी कसरत होणार आहे. त्यामुळेनिवडणुकीची देखील रंगत वाढणार आहे.
चार नगरपरिषदेत आठ उमेदवारांचे अपील
ज्या उमेदवारांचे नामांकन अवैध ठरविण्यात आले अशा आठ उमेदवांनी अपील दाखल केली आहे. यामध्ये अचलपूर नगराध्यक्ष पदाचे उमेदवारासह अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, धारणी आणि अचलपूर येथून सदस्य पदाच्या उमेदवारांचा समावेश आहे. या अपीलावर २५ नोव्हेंबरच्या आत सुनावणी घेऊन ते विशेष न्यायालयातून निकाली काढले जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी