नाशिक जिल्ह्यात आफ्रिकन स्वाईन फीवर आढळला नाही - पशुसंवर्धन उपायुक्त
नाशिक, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। - आफ्रिकन स्वाईन फीवर प्रादुर्भावाबाबत सर्वतोपरी करण्यात येत असून सध्या अशा प्रकारे कुठेही जिल्ह्यात आढळून आलेले नाही याबाबत सर्वांना खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वराह पासुन
नाशिक जिल्ह्यात आफ्रिकन स्वाईन फीवर आढळला नाही - पशुसंवर्धन उपायुक्त


नाशिक, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। - आफ्रिकन स्वाईन फीवर प्रादुर्भावाबाबत सर्वतोपरी करण्यात येत असून सध्या अशा प्रकारे कुठेही जिल्ह्यात आढळून आलेले नाही याबाबत सर्वांना खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वराह पासुन वराहाना होणाऱ्या आफ्रिकन स्वाईन फीवर प्रादुर्भाव बघता जिल्ह्यात पशुसंवर्धन उपायुक्त प्रशांत धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविण्यात आली होती या मोहिमेमध्ये कुठल्याही प्रकारे अशा प्रकारचा प्रादुर्भाव आढळून आलेला नाही अजूनही याबाबत वेगवेगळ्या भागांमध्ये तपासणी करण्यात येत आहे नागरिकांना देखील आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. याबाबत पशुसंवर्धन उपायुक्त प्रशांत धर्माधिकारी यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की जिल्ह्यातील शरण ऑफ ऍनिमल या संस्थेमध्ये तपासणी करण्यात आली त्या ठिकाणी अशी कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आलेली नाही तसेच विविध ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे पशुवैद्यकीय अधिकारी हे या सर्व परिस्थिती वरती लक्ष ठेवून आहेत जिल्ह्यातील महानगरपालिका नगरपालिका तसेच इतर संस्थांनाही आवश्यक ती खबरदारी घेऊन माहिती कळविण्याबाबत सांगितले आहे. असे सांगून धर्माधिकारी म्हणाले की जिल्ह्यामध्ये अशा स्वरूपाच्या प्रादुर्भावा बाबत प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande