
पुणे, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (ठाकरे) या तीन पक्षांनी नगरपरिषदा आणि नगरपंचयतींच्या निवडणुकीत एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना ऐनवेळी पक्षप्रवेश देऊन उमेदवारांची पळवापळवी केली. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ने मित्रपक्षांबरोबरच महाविकास आघाडीतील उमेदवारांना पक्षात घेेऊन बेरजेचे राजकारण केल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, त्यांच्या या राजकीय खेळीत सर्वपक्षीय रोष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाबाबत पसरला असल्याने त्याचे पडसाद या निवडणुकांमध्ये कसे उमटणार, याबाबत उसुकता असणार आहे.पुणे जिल्हा हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्राबल्य असलेला आहे. मात्र, अनेक ठिकाणी भाजपने बस्तान बांधण्यास सुरुवात केली आहे.
भाजपने निवडणुकांपूर्वीच पक्षप्रवेश देऊन पक्षबांधणीला प्राधान्य दिले. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ने निवडणुकीच्या काळात महायुतीतील मित्रपक्षांबरोबरच महाविकास आघाडीतील प्रभावी उमेदवारांना पक्षात घेऊन आव्हान उभे केले आहे. सर्वच पक्षांतील इच्छुकांना ऐनवेळी पक्षात घेल्याने अजित पवारविरूद्ध सर्वपक्ष असे चित्र निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु