आळंदीत महायुतीतील मित्रपक्षांमध्ये लढत; भाजपचा एक उमेदवार बिनविरोध
पुणे, 22 नोव्हेंबर, (हिं.स.)। आळंदी नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी प्रशांत कुऱ्हाडे (भाजप) आणि प्रकाश कुऱ्हाडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन पक्षांमध्ये चुरस आहे. कुऱ्हाडे यांच्यासह उमेश डरपे, सुरेश दौंडकर या दोन अपक्षांसह चौरं
आळंदीत महायुतीतील मित्रपक्षांमध्ये लढत; भाजपचा एक उमेदवार बिनविरोध


पुणे, 22 नोव्हेंबर, (हिं.स.)। आळंदी नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी प्रशांत कुऱ्हाडे (भाजप) आणि प्रकाश कुऱ्हाडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन पक्षांमध्ये चुरस आहे. कुऱ्हाडे यांच्यासह उमेश डरपे, सुरेश दौंडकर या दोन अपक्षांसह चौरंगी लढत होणार आहे. नगरसेवकपदासाठी प्रभाग क्रमांक आठमधून भाजपच्या सुजाता तापकीर बिनविरोध निवडून आल्या आहेत.

नगरपरिषदेच्या निवडणुकीत दहा प्रभाग असलेल्या नगरसेवकपदाच्या २१ जागांसाठी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (शिंदे), शिवसेना (ठाकरे) अपक्षांसह ६२ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), तर काही ठिकाणी भाजप-शिवसेना (शिंदे) पक्षात लढत होत आहे.भाजपने सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) पक्षाला सर्व जागेवर उमेदवार देता आले नाहीत. प्रभाग दोनमधील लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे. मागील वेळी भाजपकडून नगराध्यक्षपदी जनतेतून निवडून आलेल्या वैजयंता उमरगेकर यांच्यासमोर तीन उमेदवारांनी आव्हान निर्माण केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande