
बीड, 22 नोव्हेंबर (हिं.स.)।अंबाजोगाई नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी आणि आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा यांच्यात प्रमुख लढत होत असल्याने शहराचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दोन्ही उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी विविध माध्यमांचा प्रभावी वापर सुरू केला आहे.
शहराच्या विविध भागात लहान-मोठ्या कॉर्नर बैठका घेऊन थेट जनतेशी संवाद साधला जात आहे. शाळा-महाविद्यालयातील मतदार कर्मचाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांची मते आणि अपेक्षा उमेदवारांनी वैयक्तिक भेटी जाणून घेतल्या जात आहेत. वाढवल्या असून, मोबाईल फोनद्वारे वैयक्तिक फोन कॉल व मॅसेज करून मतदारांशी थेट संपर्क साधला आहे. प्रचारासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला जात आहे. या माध्यमातून विकासकामांची माहिती आणि भविष्यातील योजना मतदारांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. नंदकिशोर मुंदडा यांच्या बाजूने त्यांच्या माध्यमातून किंवा आमदार नमिता मुंदडा यांच्या माध्यमातून शहरासाठी मंजूर झालेल्या कामांचा उल्लेख केला जात आहे. निवडणुकीत केवळ भूतकाळातील कामांवर नाही, तर आगामी काळात व्हिजन करावयाची कामे आणि कराव्या करावयाची काम विकासासाठीचे मांडण्यावर दोन्ही बाजूंकडून भर दिला जात आहे. यासारख्या मूलभूत सुविधांच्या स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण सुधारणेचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis