
नाशिक, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। - जिल्ह्यातील 11 नगरपालिका निवडणुकांचा प्रचाराची रणधुमाळी आजपासून रंगणार असून आता वार प्रति वार सुरू झाले असून त्यामुळे जिल्ह्यातील प्रचार या आठवड्यात शिगेला पोहोचणार आहे.
राज्यामध्ये सुरू असलेल्या नगरपालिका नगरपंचायती निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यातील मनमाड येवला सिन्नर ओझर पिंपळगाव बसवंत चांदवड इगतपुरी सटाणा भगूर त्रंबकेश्वर नांदगाव या 11 नगरपालिका मध्ये निवडणूक होणार आहे काल शुक्रवारी माघारी झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये नगरसेवक पदासाठी 1028 तर नगराध्यक्ष पदासाठी 61 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहे.
त्यामुळे आता या ठिकाणी प्रचाराला शनिवारपासून सुरुवात झालेली आहे. निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी शनिवार आणि रविवार दोन दिवस सुट्टीचे आल्यामुळे या दोन दिवसाचा उपयोग मोठ्या प्रमाणावरती उमेदवार करताना दिसून आले आहे आहे. त्यामुळे या दोन दिवसांमध्ये जिल्ह्यातील प्रचाराला खऱ्या अर्थाने रंगत आली आहे तर या प्रचारासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, कुंभ मेळा मंत्री गिरीश महाजन, यांच्या बरोबरीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दादा भुसे तसेच शिंदे सेनेच्या वतीने इतर काही मंत्री तर उबाठा शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेचे नियोजन सुरू आहे. पक्षाकडून सुषमा अंधारे सुभाष देसाई, तसेच अन्य काही पक्षाचे नेते सभा घेणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने अजित पवार यांची सभा इगतपुरी किंवा सिन्नर मध्ये घेण्याच्या हालचाली सुरू असून त्याबाबत अद्याप पर्यंत निर्णय झालेला नाही मात्र पक्षाच्यावतीने इतर काही मंत्री सभा घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे त्यांची नावे मात्र अजून निश्चित झालेली नाही असे पक्ष कार्यालयाकडून सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV