सोलापूरात भाजपाच्या माजी शहराध्यक्षासह दोघांची आरक्षण सोडतीवर हरकत
सोलापूर, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनाने १७ नोव्हेंबरला फेर आरक्षण सोडत काढली. या सोडत प्रक्रियेस स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि राम वाकसे अशा दोघांनी महापालिका
bjp


सोलापूर, 22 नोव्हेंबर (हिं.स.)।

महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनाने १७ नोव्हेंबरला फेर आरक्षण सोडत काढली. या सोडत प्रक्रियेस स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि राम वाकसे अशा दोघांनी महापालिका निवडणूक कार्यालयात लेखी स्वरूपात केली आहे.सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जी आरक्षण सोडत प्रक्रिया राबविण्यात आली, त्या ११ नोव्हेंबर रोजीच्या पहिल्या प्रक्रियेमध्ये प्रथम अनुसूचित जातीचे आरक्षण काढण्यात आले. त्यामध्ये प्रभाग २४ (अ) मध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारण असे आरक्षण पडले होते. २४ (ब) मध्ये अनुसूचित जमातीची महिला हे थेट आरक्षण काढण्यात आले. २४ (क) हे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सोडत मधून काढल्यानंतर २४ ड सर्वसाधारण महिलेसाठी सोडत निघाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande