अजित पवारांपेक्षा देवेंद्र फडणवीसांवर विश्वास ठेवा : मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्यात आज युतीचे सरकार असले तरी, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आपले पक्ष स्वबळावर लढत असल्याचे चित्र राज्यात दिसतं आहे. भोर नगरपरिषद निवडणूकीमध्ये भारतीय जनता पार्टी सर्व जागा २० लढवत आहे. पुण्याचे पालकमंत्री राष्ट्रवा
C Patil Punee


पुणे, 22 नोव्हेंबर (हिं.स.)।

राज्यात आज युतीचे सरकार असले तरी, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आपले पक्ष स्वबळावर लढत असल्याचे चित्र राज्यात दिसतं आहे. भोर नगरपरिषद निवडणूकीमध्ये भारतीय जनता पार्टी सर्व जागा २० लढवत आहे. पुण्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे जरी असले तरीही मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्याकडे पाहून कमळाच्या चिन्हासमोरील बटण दाबून सर्व उमेदवार विजयी करा, असे आवाहन कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भोरच्या प्रचार सभेमध्ये केले.

माजी आमदार संग्राम थोपटे यांनी लोककल्याणासाठी भाजपा पक्षात प्रवेश केला आहे. विधानसभेच्या अगोदर त्यांनी भाजपात प्रवेश केला असता तर ते आज भोर विधानसभेचे आमदार असते, असे उदगार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले. भोर शहरातील वाघजाई मंदिराच्या शेजारी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भोर नगरपरिषद निवडणुकीचे भाजपा प्रभारी अध्यक्ष राजेंद्र शिळीमकर, पुणे जिल्हाध्यक्ष दक्षिण विभाग शेखर वढणे, राजगड ज्ञानपीठच्या मानद सचिवा स्वरूपा थोपटे, पृथ्वीराज थोपटे, भाजपा नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार संजय जगताप, भाजपा राज्य परिषद सदस्य बाळासाहेब गरुड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष जीवन कोंडे, भाजपा भोर तालुका अध्यक्ष संतोष धावले, सर्व उमेदवार व इतर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande