रवी राणांच्या दबावाला काँग्रेसची ‘अंडरग्राउंड’ रणनीती
सर्व उमेदवार अज्ञातस्थळी हलविले अमरावती, 22 नोव्हेंबर (हिं.स.)नगरपरिषद निवडणुकीत नामांकन मागे घेण्याच्या अंतिम दिवशी चिखलदऱ्यात पुरते राजकीय वारे उलटसुलट वाहू लागले. प्रभाग क्रमांक १० मध्ये काँग्रेसच्या एका उमेदवाराने गुरुवारी नामांकन मागे घेतल्या
“सपकाळांना चिखलदऱ्याचा अभ्यासच नाही”- आ. रवि राणा  यशोमती ठाकुर यांच्यावरही केलि टिका


सर्व उमेदवार अज्ञातस्थळी हलविले

अमरावती, 22 नोव्हेंबर (हिं.स.)नगरपरिषद निवडणुकीत नामांकन मागे घेण्याच्या अंतिम दिवशी चिखलदऱ्यात पुरते राजकीय वारे उलटसुलट वाहू लागले. प्रभाग क्रमांक १० मध्ये काँग्रेसच्या एका उमेदवाराने गुरुवारी नामांकन मागे घेतल्यानंतर शुक्रवारी पुन्हा काही उमेदवार ‘संपर्कात’ आल्याची चर्चा रंगली. या चर्चेमुळे काँग्रेस गोटात चांगलीच खळबळ उडाली. पक्षाच्या शीर्ष नेत्यांनी तात्काळ चिखलदऱ्यात तळ ठोकला आणि ‘नो रिस्क’ म्हणत सर्व उमेदवारांना अज्ञात स्थळी हलविण्याचा निर्णय घेतला.

शुक्रवारी दुपारी १ वाजता विविध वाहनांतून नगराध्यक्ष पदासह एकूण २० उमेदवारांना सुरक्षित ठिकाणी रवाना करण्यात आले. परतवाडा परिसरात सर्वांनी जेवण उरकले. नामांकन मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत उमेदवारांना गुप्तस्थळीच ठेवण्यात आले. वेळ टळल्यानंतरच सर्व उमेदवारांना पुन्हा चिखलदऱ्यात परत पाठवण्यात आले. त्यामुळे शुक्रवारी काँग्रेसचा एकही उमेदवार ‘फुटला’ नाही.

तथापि, या संपूर्ण परिस्थितीत आ. रवी राणा यांची ‘दहशत’ काँग्रेसमध्ये स्पष्टपणे जाणवत असल्याची चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली. सात उमेदवार संपर्कात असल्याच्या अफवांनी वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. खा. बळवंत वानखेडे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार राजकुमार पटेल यांच्यासह वरिष्ठ नेते दिवसभर चिखलदऱ्यात तळ ठोकून परिस्थितीवर नियंत्रण ठेवताना दिसले.

चिखलदऱ्यातील निवडणूक वातावरणाने शुक्रवारी ताण-तणावाचा उच्चांक गाठला. ‘राणा फॅक्टर’मुळे काँग्रेसला उमेदवारांना एका दिवसासाठी सुरक्षित ठिकाणी ठेऊन निवडणूक बचाव कार्य करावे लागले—हे संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले.

खासदार पोहोचले सकाळी, पटेल मुक्कामी

आ. रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती रिंगणात असलेल्या पांढरी प्रभाग १० मधून दोन अपक्ष व काँग्रेसच्या इरशाद शेख जमीन यांना नामांकन मागे घ्यायला लावण्यात प्रमुख भूमिका बजावली. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. गुरुवारी दुपारपासूनच माजी मंत्री यशोमती ठाकूर व बबलू देशमुख यांनी चिखलदऱ्यात तळ ठोकून मोर्चा सांभाळला. माजी आमदार राजकुमार पटेल रात्र मुक्कामी थांबले. शुक्रवारी सकाळीच खा. बळवंत वानखडे देखील तेथे पोहोचले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande