अमरावती : निवडणुकांत रोजगाराच्या संधी; दिवसाला ५०० रुपयांची कमाई !
अमरावती, 22 नोव्हेंबर (हिं.स.) | जिल्हात दहा नगर परिषदा व दोन नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या तयारीने जिल्ह्यात राजकीय रणसंग्राम चांगलाच तापला आहे. येत्या २६ नोव्हेंबरपासून प्रचाराला थेट सुरुवात होणार असल्याने प्रचारासाठी रोजंदारी मजुरांची जोरदार मागणी
निवडणुकांत रोजगाराच्या संधी; दिवसाला ५०० रुपयांची कमाई !


अमरावती, 22 नोव्हेंबर (हिं.स.) | जिल्हात दहा नगर परिषदा व दोन नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या तयारीने जिल्ह्यात राजकीय रणसंग्राम चांगलाच तापला आहे. येत्या २६ नोव्हेंबरपासून प्रचाराला थेट सुरुवात होणार असल्याने प्रचारासाठी रोजंदारी मजुरांची जोरदार मागणी वाढणार आहे. विविध पक्षांना रॅली आणि प्रचार सभांमध्ये गर्दी वाढवण्यासाठी तसेच झेंडे व प्रचारपत्रक वाटपासाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची गरज भासणार आहे. यातून मजुरांना हंगामी रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

नगर परिषद निवडणुकीमुळे हंगामी रोजगाराच्या संधी वाढल्या असून, रॅलीतील मजुरांना ४०० ते ५०० रुपये प्रतिदिन मजुरी मिळण्याचा अंदाज आहे. या रॅलींमध्ये महिला-पुरुषांबरोबरच गृहिणी आणि वृद्धांनाही काम मिळण्याची शक्यता असल्याने या हंगामी रोजगाराचा सामाजिक स्तरावर सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्ष स्वबळाचा नारा देत दंड थोपटून मैदानात उतरले आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आणि शिवसेना यांच्यात सामना रंगणार आहे. ही निवडणूक आगामी विधानसभा निवडींसाठीही महत्त्वाची ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

उमेदवारांचा थेट संपर्कावर भरउमेदवार आणि कार्यकर्ते मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी घरोघरी संपर्क, सभा, सोशल मीडिया, रॅली आणि रोड शो अशा अनेक माध्यमांच्या वापरावर भर देतात. सध्या तरी उमेदवारांनी थेट घरोघरी संपर्कावर जोर दिला आहे.

यांनाही मिळणार निवडणुकांचा फायदानिवडणूक प्रचारामुळे फक्त मजुरांनाच नव्हे, तर स्थानिक छोटे व्यापारी, वाहनचालक, ध्वनी यंत्रणा ऑपरेटर, बॅनर-पोस्टर विक्रेते, केटरिंग सेवा, व्हिडिओग्राफर यासारख्या व्यवसायांनाही मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. निवडणूक काळात यांचे उत्पन्न सरासरीपेक्षा दुप्पट वाढते, ज्यामुळे स्थानिक अर्थसंकल्पाला मोठा दिलासा मिळतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande