सोलापूर - ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडून असहकार आंदोलन
सोलापूर, 22 नोव्हेंबर, (हिं.स.)। प्रशासनाच्या जाचाला कंटाळून ग्रामपंचायत अधिकाऱ्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रशासनातील वरिष्ट अधिकाऱ्याची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी आज सोलापूर जिल्ह्यातील
सोलापूर - ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडून असहकार आंदोलन


सोलापूर, 22 नोव्हेंबर, (हिं.स.)। प्रशासनाच्या जाचाला कंटाळून ग्रामपंचायत अधिकाऱ्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रशासनातील वरिष्ट अधिकाऱ्याची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी आज सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ग्राम पंचायत अधिकाऱ्यांनी संबंधित पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

जिल्ह्यात प्रशासनाबरोबर असहकार आंदोलन सुरू केले आहे.पंचायत समिती माढा येथे सध्या कार्यरत ग्रामपंचायत अधिकारी तथा बार्शी येथील रहिवाशी प्रकाश बाविस्कर यांनी वरीष्ठ प्रशासनाच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.सध्या ते बार्शी येथील हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत.या घटनेचा निषेध म्हणुन सोलापूर जिल्हा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्यावतीने पंचायत समिती बार्शी येथे गुरुवारी एक दिवसीय धरणे आंदोलन केले होते.तसेच सदर प्रकरणाची चौकशी होऊन दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande