आगामी काळ काँग्रेसचाच - हर्षवर्धन सपकाळ
परभणी, 22 नोव्हेंबर (हिं.स.) : सत्ताधारी मंडळींचे एक एक करारनामे, पडद्याआडच्या घातक खेळ्या आता सर्वसामान्य मतदारांना समजू लागल्या आहेत. सत्तारुढ मंडळींनी दिशाभूल केलेल्या त्या सामान्य माणसांचा ओढा आता काँग्रेसकडे वळू लागला आहे. त्यामुळेच
काँग्रेस नेते मंडळींसह कार्यकर्त्यांनी एकजूटीने, एकदिलाने काम करण्याचा सल्ला


परभणी, 22 नोव्हेंबर (हिं.स.) : सत्ताधारी मंडळींचे एक एक करारनामे, पडद्याआडच्या घातक खेळ्या आता सर्वसामान्य मतदारांना समजू लागल्या आहेत. सत्तारुढ मंडळींनी दिशाभूल केलेल्या त्या सामान्य माणसांचा ओढा आता काँग्रेसकडे वळू लागला आहे. त्यामुळेच आगामी काळ काँग्रेसचाच आहे, असे मत प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी पाथरीत आयोजित केलेल्या जाहीर सभेतून व्यक्त केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची शनिवारी पाथरीत जोरदार जाहीर सभा झाली. यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी, ज्येष्ठ नेते माजी आमदार सुरेश देशमुख, माजी खासदार अ‍ॅड. तुकाराम रेंगे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, परभणी महानगर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जूनेद खान दुर्राणी यांच्यासह अन्य स्थानिक मंडळी व्यासपीठावर विराजमान होती.

प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी आपल्या भाषणातून सत्तारुढ विरोधी पक्षावर कडाडून टीका केली. तसेच पक्षातून बाहेर पडलेल्या नेतेमंडळींवरही जोरदार हल्ला चढवला. आगामी काळ हा काँग्रेसचाच आहे, असा दावाही केला. सत्तारुढ पक्षाने एका पाठोपाठ एक चुकीचे निर्णय घेतले आहेत. त्याचे तडाखे सर्व स्तरावरील व्यक्तींना, संस्थांना, समाजास बसत आहेत. त्यातूनच सत्तारुढ पक्षा विरोधातला रोष हळूहळू मोठ्या प्रमाणावर प्रगट होत आहे. उफाळून येत आहे. आगामी काळात या सत्ताधार्‍यांच्या या कार्यपध्दतीच्या विरोधात निश्‍चितच जलनमाणस दंड थोपाटून उभा राहील व काँग्रेस पक्षाच्या मागे निश्‍चितच भक्कम ताकद उभी करेल, असा विश्‍वासही व्यक्त केला. सत्ताधार्‍यांच्या विरोधात केवळ काँग्रेस पक्षच पूर्ण ताकदिनिशी लढणारा पक्ष आहे. बाकीचे ए, बी, सी मध्येच विखूरल्या गेले आहेत. त्यामुळेच लोकशाहीचे, भारतीय संविधानाचे पावित्र्य राखण्याचे काम काँग्रेसचेच आहे. सर्वसामान्य जनता लोकशाहीचे हे पवित्र्य, संविधानाचे पावित्र्य निश्‍चितपणे टिकून ठेवतील, काँग्रेसच्या पाठीशी नवी पिढी पूर्णतः भक्कमपणे उभी राहील, असा विश्‍वास व्यक्त केला.

पाथरीत जूनेद खान यांच्या रुपाने काँग्रेसने नव्या पिढीतील उमेदवार उभा केला आहे. त्यांचे निश्‍चितच पक्षासह सर्वदूर स्वागत होत आहे. दुसर्‍या पिढीतील नेतृत्व निश्‍चितच भक्कम ताकदिनिशी स्वतःचा प्रभाव सिध्द करतील, असा विश्‍वासही सपकाळ यांनी व्यक्त केला. ‘उषः काळ होता होता, काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ या गीताचा आशय ओळखून स्थानिक नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनी उद्याचा काळ आपला आहे, हे ध्यानी घ्यावे व प्रयत्नांची पराकाष्टा करावी, असे आवाहनही केले.

यावेळी विविध मान्यवरांची भाषणे झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande