
अमरावती, 22 नोव्हेंबर (हिं.स.)।
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ वर्धा येथील कुलगुरू डॉ. कुमुद शर्मा यांनी प्रथमच श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला आपल्या शिष्टमंडळासह सदीच्छा भेट दिली. मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, कोषाध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीनिवास देशपांडे, सचिव प्रा. डॉ. माधुरीताई चेंडके, सचिव प्रा. रविद्र खांडेकर, प्रा. दिपा कान्हेगावकर, डॉ. दिनानाथ नवाथे आदी पदाधिकाऱ्यांनी म. गांधी आतंराष्ट्रीय विद्यापीठ वर्षाच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले. हव्याप्र मंडळाच्या सचिव प्रा. डॉ. माधुरीताई चेंडके यांच्या पुढाकार मध्ये कुलगुरू डॉ. कुमुद शर्मा, कुलसचिव कादर नवाज खान, एसो. प्रो. डॉ. जयंत उपाध्याय, रेसिडेंट रायटर डॉ. भूषण भवै, एम.ओ.यू. समन्वयक डॉ. अनिकेत अनिल आंबेकर और प्रोटोकॉल अधिकारी राजेश यादव या शिष्टमंडळाला मंडळाची ऐतिहासिक स्थापना, स्वातंत्र्य चळवळीमध्ये योगदान, क्रीडा क्षेत्रातील वाटचाल व विस्तृत परिसराची माहीती देण्यात आली. अनंत क्रीडा सभागृहातील जिम्नॅस्टिक, नेताजी सुभाषचंद्र,बोस क्रीडा सहभागृह, मेजर ध्यानचंद इंडोअर स्टेडियम, जलतरण विभाग, योग विभागसह शैक्षणिक विभागाला भेटी देत मंडळातील खेळ व शिक्षणाचा नियोजनबद्ध समन्वयाची माहिती घेतली. आतंराष्ट्रीय विद्यापीठ एका मैत्रिपुर्ण समन्वयातून विद्यार्थी, खेळाडू व कर्मचारी यांच्या हितासाठी क्रीडा-शिक्षण समन्वयातून कार्य करू अशी इच्छा कुलगुरू डॉ. कुमूद शर्मा यांनी व्यक्त केली.मंडळाच्या स्व. सोमेश्वर पुसतकर सभागृह येथे स्वागतपर सोहळ्याचे आयोजन करीत म. गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कुमूद शर्मा व शिष्टमंडळाचे स्वागत, सत्कार करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी