श्री हरिहर सद्गुरू शक्तिपीठाचे प.पू.सद्गुरू अप्पा महाराज यांचे देहावसान
मंत्री अतुल सावे यांची आदरांजली छत्रपती संभाजीनगर, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। श्री हरिहर सद्गुरू शक्तिपीठाचे प.पू.सद्गुरू श्री.अप्पा महाराज यांचे संभाजीनगर येथे निधन झाले. श्री हरिहर सद्गुरू शक्तिपीठाचे प.पू.सद्गुरू श्री.अप्पा महाराज यांच्या देहावसान
श्री हरिहर सद्गुरू शक्तिपीठाचे प.पू.सद्गुरू श्री.अप्पा महाराज


मंत्री अतुल सावे यांची आदरांजली

छत्रपती संभाजीनगर, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। श्री हरिहर सद्गुरू शक्तिपीठाचे प.पू.सद्गुरू श्री.अप्पा महाराज यांचे संभाजीनगर येथे निधन झाले.

श्री हरिहर सद्गुरू शक्तिपीठाचे प.पू.सद्गुरू श्री.अप्पा महाराज यांच्या देहावसानाने अध्यात्मिक क्षेत्रातील एक तेजस्वी दीप शांत झाला आहे.अशा शब्दात मंत्री अतुल सावे यांनी आदरांजली वाहिली आहे.

अप्पा महाराजांनी आयुष्यभर भाविकांना प्रेम, करुणा आणि अध्यात्माचा अनमोल वारसा दिला. त्यांचे मार्गदर्शन, त्यांच्या वाणीतील शांतता आणि संस्कारांचे तेज असंख्य अनुयायांना दिशा देत राहील

मंत्री अतुल सावे म्हणाले, प.पू.अप्पा महाराजांच्या पवित्र आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande