
नाशिक, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। संगीत साधना करणे म्हणजे परमेश्वराची आराधना करण्याचा मार्ग आहे मनाची एकाग्रता, मनःशांती मिळविण्यासाठी ते उत्तम साधन आहे.स्वताच्या गायनाचा प्रवास अधिकाधिक प्रगल्भ होण्यासाठी शास्त्रीय संगीताची परंपरा जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे. जुन्या नव्या पिढीतील गायकांचे गायन ऐकणे ,समजून घेणे म्हणजे आपण प्रगल्भ होणे तसेच स्वतःतल्या सुप्त जाणिवांचा शोध घेणे होय असे प्रतिपादन सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं.प्रसाद दुसाने यांनी केले.
कुमार’ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ‘सूरविश्वास कुमारमंच’चे 16 वे पुष्प विश्वास बँक डिझास्टर हब येथे संपन्न झाले त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना पंडित दुसाने बोलत होते
यात सोलो गिटार वादन
आयुष गाडेकर ने केले त्याने राज भीम पलासी सादर केला.
सोलो तबला वादन अद्वैत शेट्टी ने केले त्याने तीन ताल सादर केला.
समूह शास्त्रीय गायन
एक्सप्रेशन्स अकॅडमी अकॅडमी,नाशिकच्या विद्यार्थ्यांनी केले त्यात हरिप्रिया ठक्कर ,
अनुष्का सिंग, अन्वी आहिर ,
काजल नाठे, अर्पिता कुलकर्णी
रागा गाडगे ,ऋग्वेद कुलकर्णी यांनी केले यांनी राग दुर्गा व च तरंग सादर केला.
समूह सहवादन
वेदिका नेरुरकर ,सृष्टी घाटे
प्रत्यूष सोनवणे ,पार्थ वाजे
सोहम धनगे ,अवनीश पळवे
प्रणम्य जोशी ,लक्षित नारकर यांनी केले. त्यांनी राग यमन सादर केला.
‘आयोजक विश्वास लिलावती जयदेव ठाकूर, ऋचिता ज्योती विश्वास ठाकूर, संकल्पक विनायक आशा पुरूषोत्तम रानडे आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV