सोलापूर - डाॅ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मनीषाच्या दोषमुक्ती अर्जावर चार डिसेंबरला सुनावणी
सोलापूर, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। सोलापुरातील प्रसिध्द न्युरो फिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मुसळे-मानेच्या दोषमुक्तीच्या अर्जावर युक्तिवाद होणार होता. परंतु न्यायालयाने पुढील तारीख दिली असून आता चार डिसे
सोलापूर - डाॅ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मनीषाच्या दोषमुक्ती अर्जावर चार डिसेंबरला सुनावणी


सोलापूर, 22 नोव्हेंबर (हिं.स.)।

सोलापुरातील प्रसिध्द न्युरो फिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मुसळे-मानेच्या दोषमुक्तीच्या अर्जावर युक्तिवाद होणार होता. परंतु न्यायालयाने पुढील तारीख दिली असून आता चार डिसेंबर रोजी दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद होणार आहे.डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या मनीषा मुसळे-माने हिने या गुन्ह्यात दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयात सादर केला आहे. त्याचबरोबर वळसंगकर कुटुंबियांसोबतच इतर काही लोकांचे मोबाईल सीडीआर जतन करण्याची मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्या न्यायालयात सुनावणी होणार होती. परंतु न्यायालयाने युक्तिवादासाठी पुढील तारीख दिली. त्यामुळे आता चार डिसेंबर रोजी दोन्ही बाजूचा युक्तिवाद होणार आहे.सरकार पक्ष व तपास अधिकाऱ्यांनी सात नोव्हेंबर रोजी दोषमुक्तीचा अर्ज आणि सीडीआरबाबत म्हणणे सादर केले आहे. अर्जात नमूद सर्व साक्षीदारांचे सीडीआर व एसडीआर मिळवण्याकरिता पत्रव्यवहार केला असून सदर सीडीआर व एसडीआर प्राप्त होताच ते न्यायालयात सादर करण्यास तयार असल्याचे सरकार पक्षाने सांगितले आहे. या खटल्यात मनीषा मुसळे-माने हिच्यातर्फे ॲड. प्रशांत नवगिरे तर सरकारतर्फे ॲड. प्रदीपसिंह रजपूत हे काम पाहत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande