रायगड जिल्ह्यात ६ हजारांहून अधिक उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षेला बसणार
रायगड, 22 नोव्हेंबर, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (TET) रायगड जिल्ह्यातील उमेदवारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पनवेल शहरातील एकूण 6 परीक्षा
रायगड जिल्ह्यात ६ हजारांहून अधिक उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षेला बसणार


रायगड, 22 नोव्हेंबर, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (TET) रायगड जिल्ह्यातील उमेदवारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पनवेल शहरातील एकूण 6 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा दोन सत्रांमध्ये पार पडणार आहे.

सकाळच्या सत्रात पेपर 1 ची परीक्षा सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 या वेळेत घेण्यात येणार असून पेपर 1 साठी जिल्ह्यातील 2,515 उमेदवार बसणार आहेत. तर दुपारच्या सत्रात पेपर 2 ची परीक्षा दुपारी 2.30 ते 5.00 या वेळेत होणार असून या सत्रासाठी 3,459 उमेदवार उपस्थित राहणार आहेत.

यंदाच्या TET परीक्षेत गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाकडून अत्यंत काटेकोर आणि तंत्रज्ञानाधारित नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा परिषदेकडून प्रथमच कनेक्ट व्ह्यू आणि फोटो व्ह्यू या दोन आगळ्यावेगळ्या प्रणाली लागू करण्यात आल्या आहेत. याशिवाय प्रत्येक केंद्रावर AI आधारित सीसीटीव्ही प्रणाली बसविण्यात आली आहे. ही यंत्रणा 24 तास रेकॉर्डिंग करत असून चेहरा, आवाज आणि कोणत्याही प्रकारचे विचलन तत्काळ टिपू शकते.

फोटो व्ह्यू प्रणालीमुळे नोंदणीतील उमेदवाराचा फोटो आणि प्रत्यक्ष परीक्षेला बसलेला परीक्षार्थी यांची जुळवणी एआय तंत्रज्ञानाद्वारे काही सेकंदात होणार आहे. त्याचप्रमाणे बायोमेट्रिक हजेरी आणि फेस स्कॅनिंगद्वारे उमेदवारांची ओळख अधिक अचूकपणे तपासली जाणार आहे.

परीक्षा केंद्रांवर भरारी पथके नियुक्त करण्यात आली असून केंद्रप्रमुख आणि कंट्रोल रूम यांच्यात लाईव्ह कनेक्ट राहणार आहे. या सर्व उपाययोजनांमुळे परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि सुरळीत पार पडेल, असा विश्वास जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती ललिता दहिदुले यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande