पिंपरीत नेतृत्व करण्यावरून भाजपमध्ये चढाओढ
पुणे, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्याकडे निवडणूक प्रमुख म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीची सूत्रे हाती दिल्यानंतर आता जिल्हा निवडणूक संचलन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच
पिंपरीत नेतृत्व करण्यावरून भाजपमध्ये चढाओढ


पुणे, 22 नोव्हेंबर (हिं.स.)।

भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्याकडे निवडणूक प्रमुख म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीची सूत्रे हाती दिल्यानंतर आता जिल्हा निवडणूक संचलन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या संयोजक पदाची जबाबदारी विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. निवडणुकीची कमान आपल्या हाती आल्याचे आमदार गोरखे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. त्यामुळे निवडणुकीचे नेतृत्व करण्यावरून भाजपमध्ये आत्तापासूनच स्पर्धा, चढाओढ सुरू झाल्याचे दिसून येत आहे.आगामी महापालिका निवडणुकीत शहर भाजपने शंभरहून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा नारा दिला आहे. भाजपखालोखाल शहरात महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षाची ताकद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्येच लढत होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीचे नेतृत्व करण्यावरून भाजपमध्ये स्पर्धा दिसून येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande