पोलिस दलाच्या नांदेड परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ
परभणी, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। पाथरी येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर शनिवारपासून 30 वी नांदेड परिक्षेत्रीय क्रिडा स्पर्धांना प्रारंभ झाला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु इंद्र मणि यांच्याहस्ते या स्पर्धांचे उद्
25 नोव्हेंबर पर्यंत स्पर्धा चालणार : चार जिल्ह्यातील खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग


परभणी, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। पाथरी येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर शनिवारपासून 30 वी नांदेड परिक्षेत्रीय क्रिडा स्पर्धांना प्रारंभ झाला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु इंद्र मणि यांच्याहस्ते या स्पर्धांचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ, सहाय्यक पोलिस अधिक्षक जीवन बेनीवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी डंबाळे यांच्यासह चंद्रसेन देशमुख, समाधान पाटील, अनिरुध्द काकडे व अन्य अधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेत परभणी, नांदेड, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले आहेत. विविध क्रिडा प्रकाराच्या स्पर्धा येथे होणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande