
भाविकांसाठी शंभर खाटाचे रुग्णालय उभारले जाणार
नाशिक, 22 नोव्हेंबर (हिं.स.)।
: सिंहस्थ कुंभमेळ्या मुख्य केंद्र असलेल्या साधुग्राममधील साधू-महंत व भाविकांसाठी शंभर खाटाचे रुग्णालय उभारले जाणार आहे. यासाठी आठ कोटींचा खर्च येणार असून या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळावी. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासन सिंहस्थ प्राधिकरणला सादर करणार आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वरसाठी शासनाने पंचवीस हजार कोटीच्या विकास आराखडयाला मंजुरी दिली आहे. काही दिवसांपूवच मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याहस्ते नाशकतात सुमारे साडे पाच हजार कामांचा शुभारंभ झाला. दरम्यान महापालिका प्रशासन आपल्या अख्यारित कामे माग लावण्यासाठी धावपळ करत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याकरिता दुसऱ्या टप्यातील तीनशे कोटींच्या रस्ते कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर मनपाने आता आरोग्याकडे आपला मोर्चा वळ्वला आहे. त्यानुसार साधुग्राममध्ये प्रस्तावित रुग्णालयासाठी मनपा प्रशासनाने सिंहस्थ प्राधिकरणकडे प्रशासकीय खर्चाला मंजुरी देण्याची मागणी केली आहे. सुमारे तीन महिने साधुग्राममध्ये भाविकांची वर्दळ असणार आहे. नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ एन पावसाळ्यातच होत असल्याने साथीच्या आजाराची भीती असते. अशावेळी आरोग्याचा प्रश्न उदभवू नये. याकरिता महापालिका प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. विशेषत: यंदा थेट शंभर खाटांचे रुग्णालय उभारले जाणार आहे. या रुग्णालयात दहा ते पंधरा तज्ञ डॉक्टरांची टीम असणार आहे.
साधुग्राममध्ये शंभर खाटांचे रुग्णालय बांधले जाणार आहे. यासाठी प्रशासकीय मंजुरी मिळावी, याबाबतचा प्रस्ताव सिंह्स्थ प्राधिकरणकडे पाठवला जाणार आहे.-करिश्मा नायर, अति.आयुक्त, मनपा
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV