
पुणे, 22 नोव्हेंबर (हिं.स.)।
पुण्यात नवले ब्रिजवर १३ नोव्हेंबरला भीषण अपघात झाला होता. या अपघातामधे जवळपास आठ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर अपघाताच्या ठिकाणीच हा दशक्रिया विधी केला आहे. अपघाताला दहा दिवस झालेले असल्याचं नागरिकांनी म्हटलं. नवले पुलावर होणाऱ्या अपघातामुळे वाहनचालकांमधून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. १० दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला होता. याआधीही अनेक अपघात या पुलावर झाले आहेत. पुलावरील वाढत्या अपघातानंतर विरोध म्हणून स्थानिकांनी अपघातस्थळी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निषेध केला. संताप व्यक्त करत एनएचएआयचा प्रतिकात्मक दशक्रिया विधी आयोजित करण्यात आला होता.
नवले पुलावर होणारे अपघात कमी करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीय. अपघातात नाहक बळी जात आहेत. ढिम्म प्रशासनाकडून काहीच हालचाली होत नसल्यानं संतप्त नागरिकांनी एनएचएआयचा दशक्रिया विधी केला. प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात हे आंदोलन असून सुरक्षेची तातडीनं उपाययोजना करा अशी मागणी नागरिकांनी केलीय.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु