
छत्रपती संभाजीनगर, 22 नोव्हेंबर (हिं.स.)।
धाराशिव जिल्ह्यातील आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे सुपुत्र चि. मल्हार यांच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री पंकजा मुंडे यांचे आज धाराशिव नगरीत आगमन झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धाराशिव येथे चि. मल्हार आणि चि. सौ.कां. साक्षी यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवदांपत्याला आशीर्वाद दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis