पुणे :  मंचर नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा जण
पुणे, 22 नोव्हेंबर, (हिं.स.)। मंचर नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार व नगरसेवकांच्या १६ जागांसाठी ६७ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक आठ मध्ये सर्वाधिक सात उमेदवार उभे आहेत. प्रभाग क्रमांक एक मधून माजी खासदार (स्व) किसनराव बाणख
पुणे :  मंचर नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा जण


पुणे, 22 नोव्हेंबर, (हिं.स.)। मंचर नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार व नगरसेवकांच्या १६ जागांसाठी ६७ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक आठ मध्ये सर्वाधिक सात उमेदवार उभे आहेत. प्रभाग क्रमांक एक मधून माजी खासदार (स्व) किसनराव बाणखेले यांच्या सून वंदना कैलास बाणखेले (राष्ट्रवादी कॉंग्रेस) या बिनविरोध निवडणून आल्या आहेत. त्यांच्यासाठी शिल्पा अमोल काजळे (शिवसेना) यांनी माघार घेतली आहे. महायुती व महाविकास आघाडीतही फुट पडली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यात युती, ठाकरे शिवसेना व पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात युती व कॉंग्रेस व आम आदमी पार्टी यांच्यात युती झाली आहे.शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढवत आहे. त्यामुळे येथील निवडणूक अटीतटीची व रंगतदार होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप युतीच्या मोनिका सुनील बाणखेले (राष्ट्रवादी काँग्रेस), राजश्री दत्ता गांजाळे (शिवसेना), उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस युतीच्या रजनीगंधा राजाराम बाणखेले (ठाकरे शिवसेना), कॉंग्रेस व आम आदमी पार्टीच्या फर्जीन मुलाणी (कॉंग्रेस), प्राची आकाश थोरात (अपक्ष) व जागृती किरण महाजन (अपक्ष) नगराध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande