रस्ता भूसंपादनावर सोमवारपर्यंत तोडगा, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
नाशिक, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। - सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर-घोटी महामार्गाचे रुंदीकरण प्रस्तावित असून, त्यासाठी भू-संपादनाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. परंतु, रुंदीकरणासाठी जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध असून, जिल्हाधि
रस्ता भूसंपादनावर सोमवारपर्यंत तोडगा, जिल्हाधिकारी प्रसादांचे आश्वासन


नाशिक, 22 नोव्हेंबर (हिं.स.)।

- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर-घोटी महामार्गाचे रुंदीकरण प्रस्तावित असून, त्यासाठी भू-संपादनाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. परंतु, रुंदीकरणासाठी जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध असून, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला. भू-संपादनात कोणाचेही नुकसान होणार नाही, याची काळजी घेऊ असे जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले. या प्रश्नावर सोमवारपर्यंत (दि. २४) योग्य तोडगा काढण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.रस्ता रुंदीकरणासाठी जमीन देणार नाही, अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी आंदोलनही सुरू केले आहे. राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन दोन दिवसांपूर्वी मुंबईत भू-संपादनाचा आढावा घेतला. या जिल्हाधिकारी प्रसाद यांनी शुक्रवारी शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात प्रसाद यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली.

त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. आम्ही सरकारी प्रकल्पांसाठी जमिनी दिल्या की वर्षानुवर्षे भरपाई मिळत नाही. तसेच भरपाईची रक्कमही तुटपुंजी असते, अशी कैफियत शेतकऱ्यांनी मांडली. भू-संपादन प्रक्रियेत कोणत्याही शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, तसेच या प्रश्नावर सोमवारपर्यंत सकारात्मक तोडगा काढू, अशी ग्वाही प्रसाद यांनी शेतकऱ्यांना दिली.

नाशिकसह त्र्यंबकेश्वरमध्ये सन २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरणार असून, त्र्यंबकेश्वर - घोटी महामार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हे रुंदीकरण केले जाणार आहे. परंतु, यासाठी स्थानिक शेतकऱ्यांना आपल्या जमिनी द्याव्या लागणार आहेत. मात्र, त्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande