रत्नागिरी शहरात महाविकास आघाडीत फूट
रत्नागिरी, 22 नोव्हेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत रत्नागिरीत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. काँगेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांसमोर उबाठा पक्षाने आपले उमेदवार उभे केल्याने दोन्ही काँग्रेसने आघाडीतून बाहे
रत्नागिरी शहरात महाविकास आघाडीत फूट


रत्नागिरी, 22 नोव्हेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत रत्नागिरीत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. काँगेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांसमोर उबाठा पक्षाने आपले उमेदवार उभे केल्याने दोन्ही काँग्रेसने आघाडीतून बाहेर पडण्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेस प्रदेश चिटणीस रमेश कीर यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही भूमिका स्पष्ट केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार गटाचे नेते मिलिंद कीर, सईदा पावसकर आदी उपस्थित होते. नगर परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार गटाला पाच तर काँग्रेस पक्षाल तीन अशा आठ जागा देण्यात आल्या होत्या. त्यातील दोन प्रभागातील तीन जागांवर उबाठा पक्षाने उमेदवार उभे केले. प्रभाग क्रमांक १६ मध्ये दोन्ही काँग्रेसला जागा देण्यात आल्या असताना उबाठाकडून तेथे उमेदवार उभे करण्यात आले. तसेच प्रभाग क्रमांक १३ मध्ये एक जागा काँग्रेसला सोडण्यात आली होती. त्याठिकाणी उबाठाकडून उमेदवार उभा करण्यात आला. उमेदवारी अर्ज मागे घेतेवेळी या तिन्ही ठिकाणी अर्ज मागे घेतले जातील असे उबाठा पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात आले होते. परंतु, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीही अर्ज मागे न घेतल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार गट या दोघांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता दोन्ही काँग्रेस एकत्र लढणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande