रायगड - तक्रारींनंतरही कारवाई शून्य; आराठीत नाल्याच्या पाण्यामुळे नागरिक संतप्त
रायगड, 22 नोव्हेंबर, (हिं.स.)। आराठी येथील शबीना पेट्रोल पंपाजवळील कोहिनूर बिल्डिंग परिसरात नाल्याचे दूषित पाणी रस्त्यावर वाहत आल्याने स्थानिक संतप्त झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून नाल्याचे घाणेरडे पाणी मुख्य रस्त्यावरून वाहत असल्याने वाहनचालक
आराठी येथील शबीना पेट्रोल पंपाजवळील कोहिनूर बिल्डिंग परिसरात नाल्याचे दूषित पाणी रस्त्यावर वाहत आल्याने स्थानिक नागरिकांच्या त्रासाला अक्षरशः शिगोशीग आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाल्याचे घाणेरडे पाणी मुख्य रस्त्यावरून वाहत असल्याने वाहनचालक, पायदळ नागरिक, तसेच परिसरातील दुकानदार यांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. दुर्गंधी इतकी वाढली आहे की, रस्त्यावरून जाणाऱ्यांना नाक दाबूनच पुढे जावे लागत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.  स्थानिक नागरिकांनी ही समस्या तातडीची असून धोकादायक असल्याचे वारंवार ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिले. मात्र अनेक तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा संशयही व्यक्त होत आहे.  नाल्याचे पाणी रस्त्यावर येत असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून, वाहन घसरून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. सतत पसरत राहणाऱ्या दूर्गंधीमुळे परिसरातील वातावरण अस्वच्छ झाले असून आजारपणाचा धोका वाढत चालल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रसार होण्याचीही शक्यता वाढली आहे.  सामान्य नागरिकांच्या सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष करून ही समस्या मुद्दामच रखडवली जाते आहे का, असा गंभीर प्रश्न स्थानिकांच्या मनात निर्माण झाला आहे. समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने तातडीने स्थलपाहणी करून नाल्याची स्वच्छता व दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.  दरम्यान, समस्या त्वरित मार्गी न लावल्यास मोर्चा, आंदोलन किंवा ग्रामपंचायत कार्यालयाला घेराव घालण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.


रायगड, 22 नोव्हेंबर, (हिं.स.)। आराठी येथील शबीना पेट्रोल पंपाजवळील कोहिनूर बिल्डिंग परिसरात नाल्याचे दूषित पाणी रस्त्यावर वाहत आल्याने स्थानिक संतप्त झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून नाल्याचे घाणेरडे पाणी मुख्य रस्त्यावरून वाहत असल्याने वाहनचालक, पायदळ नागरिक, तसेच परिसरातील दुकानदार यांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. दुर्गंधी इतकी वाढली आहे की, रस्त्यावरून जाणाऱ्यांना नाक दाबूनच पुढे जावे लागत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

स्थानिक नागरिकांनी ही समस्या तातडीची असून धोकादायक असल्याचे वारंवार ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिले. मात्र अनेक तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा संशयही व्यक्त होत आहे.

नाल्याचे पाणी रस्त्यावर येत असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून, वाहन घसरून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. सतत पसरत राहणाऱ्या दूर्गंधीमुळे परिसरातील वातावरण अस्वच्छ झाले असून आजारपणाचा धोका वाढत चालल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रसार होण्याचीही शक्यता वाढली आहे.

सामान्य नागरिकांच्या सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष करून ही समस्या मुद्दामच रखडवली जाते आहे का, असा गंभीर प्रश्न स्थानिकांच्या मनात निर्माण झाला आहे. समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने तातडीने स्थलपाहणी करून नाल्याची स्वच्छता व दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, समस्या त्वरित मार्गी न लावल्यास मोर्चा, आंदोलन किंवा ग्रामपंचायत कार्यालयाला घेराव घालण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande