नाशिक शहरात 86 हजार दुबार नावे, मनपा निवडणुकीपूर्वी आकडेवारीसमोर आल्याने खळबळ
नाशिक, 22 नोव्हेंबर (हिं.स.) - नाशिक महापालिकेने नुकतीच प्रभागनिहाय मतदार यादी जाहीर केली आहे. दरम्यान ही मतदारयादी जाहीर करताना दुबार मतदारांची आकडी समोर आल्याने खळ्बळ उडाली आहे. शहरातील नाशिक पूर्व, पश्चिम, मध्य व देवळाली मतदारसंघाचा काही भागात त
नाशिक शहरात 86 हजार दुबार नावे, मनपा निवडणुकीपूर्वी आकडेवारीसमोर आल्याने खळबळ


नाशिक, 22 नोव्हेंबर (हिं.स.) - नाशिक महापालिकेने नुकतीच प्रभागनिहाय मतदार यादी जाहीर केली आहे. दरम्यान ही मतदारयादी जाहीर करताना दुबार मतदारांची आकडी समोर आल्याने खळ्बळ उडाली आहे. शहरातील नाशिक पूर्व, पश्चिम, मध्य व देवळाली मतदारसंघाचा काही भागात तब्बल 86 हजार 688 दुबार मतदार समोर आले आहे. दरम्यान मतदानाच्या दिवशी केंद्रप्रमुख ज्यांचे नावे दुबार आहेत. त्यांच्याकडून हमीपत्र घेऊन नावे कट केले जाणार आहेत.

विधानसभा निवड्णुकीनंतर ठाकरे गटाने शहरातील बोगस मतदारांवरुन रान उठवले होते. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हयातील दुबार व बोगस मतदारांची यादीच दिली होती. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकमधील बोगस मतदारांचा उल्लेख केला होता. शहरात साडे तीन मतदारसंघात लाख भराच्या आत दुबार नावे आढळून आल्याने खळ्बळ उडाली आहे. दुबार मतदारांची नावे उघड झाल्याने पालिका निवडणुकीत पुन्हा बोगस मतदान होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या मुद्द्‌‍‍यावरून महापालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.1 जुलै 2025 ला नोंद झालेल्या मतदार याद्या राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेस उपलब्ध करून दिल्या आहेत. शहरात एकूण 13 लाख 54 हजार 77 मतदार आहेत. त्यात सात लाख 411 स्पुरुष, सहा लाख 53 हजार 587 महिला व 79 इतर मतदार आहेत.

प्रभागनिहाय मतदार यादी फोडल्यानंतर त्यात तब्बल 86 हजार 688 दुबार मतदार आढळून आले आहेत. एका मतदाराचे नाव यादीत तब्बल दोन वेळा आणि त्यापेक्षा अधिक वेळा आहेत. त्यामुळे शहरातील मतदारांची संख्या फुगली आहे. यादीचे अंतिम छाननी राज्य निवडणूक आयोगाकडूनही केली जाणार आहे. त्यात दुबार मतदारांची आणखी नावे आढळून येण्याची शक्यता आहे. परिणामी, दुबार मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दुबार मतदार आढळून आल्याने शहरात बोगस मतदार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्या माध्यमातून निवडणुकीत बोगस मतदार केले जात असल्याच आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आहे. हरकती व सूचनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुबार मतदारांचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. मात्र तोपर्यत दुबार नावांवरुन शहरातील राजकारण तापणार आहे.

मतदार पळ्वल्याचे आरोप सुरु

गुरुवारी प्रभागनिहाय मतदारयादी प्रसिद्ध होताच काही माजी नगरसेवकांसह इच्छुकांना धक्का बसला. कारण यापूव ज्या प्रभागात मतदारांची नावे होती ती आतामात्र शेजारच्या प्रभागात किंवा अगदी दुसऱ्या प्रभागात गेली आहे. यासंदर्भात मोठ्या संख्येने हरकती दाखल होणार आहे. प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात गेल्याने इच्छुकांची डोकेदुखी वाढणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande