सोलापूर जिल्ह्यातील शौचालयाची होणार तपासणी
सोलापूर, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागतिक शौचालय दिनानिमित्त सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) विभागामार्फत जिल्ह्यात “हमारा शौचालय, हमारा भविष्य” ही विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शौचालयाची होणार तपासणी


सोलापूर, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागतिक शौचालय दिनानिमित्त सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) विभागामार्फत जिल्ह्यात “हमारा शौचालय, हमारा भविष्य” ही विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. 10 डिसेंबर मानवी हक्क दिनापर्यंत हे मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.शौचालये ही केवळ सोयीची नव्हे तर आरोग्य, प्रतिष्ठा व सुरक्षिततेची हमी देणारी मूलभूत गरज आहे.

या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावातील वैयक्तिक शौचालये व सामुदायिक शौचालयांची तपासणी, दुरुस्ती, देखभाल व सुशोभीकरणावर विशेष लक्ष देण्याच्या सुचना केल्या आहेत. अपूर्ण किंवा दुरुस्तीची गरज असलेली सार्वजनिक शौचालये यांची नोंद घेऊन त्यांची दुरुस्ती करून घेणेत यावी. या कालावधीत शाळा, ग्रामसभा, स्वयंसहाय्य गट, युवक मंडळे, निवृत्त सैनिक, सामाजिक कार्यकर्ते यांचा सहभाग घेऊन स्वच्छता, आरोग्य, सुरक्षित मलनिस्सारण व स्वच्छतेबाबत जनजागृती करणेत सुचना दिल्या आहेत.ग्रामस्थांना त्यांच्या वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची रंगरंगोटी, सुशोभीकरण आणि नियमित देखभाल करण्यासाठी सूचना देन्यात यावेत. जिल्हा स्तरावर उत्तम देखभाल व सुशोभीकरण करणाऱ्या वैयक्तिक शौचालये व सामुदायिक शौचालये करणारे ग्रामपंचायतीना प्रोत्साहित करणेत येणार आहे. तसेच सार्वजनिक शौचालय उत्कृष्ट काम करणारे ग्रामपंचायती चे सरपंच व पंचायत अधिकारी यांचा विशेष गौरव दिनाक 10 डिसेंबर रोजी करणेत येणार आहे. गटविकास अधिकारी यांना लेखी पत्र काढून या सुचना दिलेले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande