
सिन्नर, 23 नोव्हेंबर (हिं.स.)।
: सिन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रचार शुभारंभ प्रसंगी निष्ठावंतांचा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना माजी आमदार वसंत गीते यांनी भाजपावर शरसंधान करतानाच मोठा गौप्यस्फोट देखील केला. राजाभाऊ वाजे यांना सत्ताधारी पक्षाकडून कश्या ऑफर येताय याबाबत त्यांनी मोठे वक्तव्य केलं. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
यावेळी बोलताना माजी आमदार वसंत गीते यांनी राजाभाऊ वाजे सारखा खासदार नाशिकला मिळाला हे नाशिकचे भाग्य असल्याचे गौरवोद्गार व्यक्त केले. यासह पुढे गौप्यस्फोट करताना १००कोटी आणि केंद्रात राज्यमंत्रीपद अशी ऑफर राजाभाऊ यांनी धुडकावून लावली आहे असे म्हणले आहे. अश्या निष्ठावंत आणि नीतीवंत नेत्यांची प्रतिष्ठा आज पणाला लागली असल्याचे देखील वसंत गीते म्हणाले. गीते यांच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजल्याच चित्र बघायला मिळत आहे. अजूनही ठाकरेंना डॅमेज करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.
वाजे कुटुंबाने सिन्नरसाठी वाहून दिल
नुकतेच भाजपाने वाजे यांच्या कुटुंबातील सदस्याला फोडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी बहाल केली. याबाबत संताप व्यक्त करताना वसंत गीते म्हणाले की, किती पाठीत खंजीर खुपसायचा, एवढी विकृत बुद्धी कशी असू शकते असा सवाल केला. गीते पुढे म्हणाले की, ज्या कुटुंबाने या सिन्नरसाठी आपलं सर्वस्व वाहून दिल त्यांना त्रास दिला जातोय.
रविवारी सायंकाळी झालेल्या या सभेनंतर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात भाजपाने देखील राजाभाऊ वाजे यांच्या वरती हल्लाबोल केला आहे सिन्नर येथील भाजपाचे नेते उदय सांगळे यांनी सांगितले की अखेर वाजे यांच्या तोंडावरती सत्य आलं आणि ते सभेमध्ये बोलले यामध्ये काहीच वावगं नाही कारण ते कोणाला घाबरले हे त्यांनी स्पष्ट सांगावे
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV