
नाशिक, 23 नोव्हेंबर (हिं.स.)।
पंचवटीतील तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीबाबत नागरिक, पर्यावरणप्रेमी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या हरकतींवर आज सोमवारी (दि.२४) सुनावणी होणार आहे. ही सुनावणी पंचवटीतील मालेगाव स्टैंड परिसरातील पंडित पलुस्कर सभागृहात दुपारी बारा वाजता घेण्यात येणार आहे. कुंभमेळा नियोजनासाठी वृक्षतोड आवश्यक असल्याचा मनपाचा युक्तिवाद असला तरी मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल झाल्यामुळे हा विषय संवेदनशील बनला आहे. मनपाकडून संबंधित हरकतदारांना सुनावणीला हजर राहण्याची सूचना देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV